स्टीम्ड चिकन विथ वेजीज / steamed chicken with veggies




साहित्य –

१. चिकन १ पाव
२. फरसबी १० शेंगा
३. गाजर एक मोठे
४. मिरपूड १ चमचा
५. चिली फ्लेक्स १ चमचा
६. ओलिव्ह ऑईल ३ चमचे
७. मीठ चवीनुसार
८. मोड आलेले मुग अर्धी वाटी
९. लिंबू १ 

कृती –

चिकन धुवून त्याला अर्ध्या लिंबूचा रस, मीठ, अर्धा चमचा मिरपूड लावून १ तास मुरण्यास ठेवावे. एका पातेल्यात पाणी घेऊन गरम करण्यास ठेवावे. त्यावर चाळणी ठेवून त्यावर चिकनचे पिसेस ठेवावे. वरून झाकण ठेवावे. gas मध्यम आचेवर ठेवावा. १५ मिनिटांनी पिसेस पलटवून घेणे. परत १० मिनिटांनी मोठे तुकडे ठेवून चिरलेले गाजर, मुग व फरसबी चिकन बरोबर शिजण्यास ठेवावी. चिकन शिजल्यावर सर्व एका भांड्यात काढून घेणे. वरील सर्व साहित्य एकत्र करावे. व सर्व्ह करावे.   

Comments