बटाट्याचे पॅनकेक / potato pancakes




साहित्य -

१. बटाटे ५
२. अंड १
३. मैदा २ चमचे
४. पातीचे कांदे २
५. मीठ चवीनुसार
६. मिरपूड दीड चमचा
७. तेल शालोफ्राय करण्याकरता 

कृती -

बटाटे धुवून त्याची साले काढून घ्यावी. जाड किसणीने किसून घ्यावे. त्यातील पूर्ण पाणी दाबून काढून टाकावे. त्यात एक अंड फोडून घालावे. मैदा, मीठ, मिरपूड टाकावी. पातीचा कांदा बारीक चिरून टाकावा. सर्व मिश्रण हाताने निट एकत्र करून घ्यावे. नॉनस्टिक तव्यावर १ चमचा तेल लावून घ्यावे. गरम झाल्यावर २ चमचे मिश्रणाचा एक पॅनकेक करावा. चमच्यानेच मिश्रण तव्यावर हळुवार पसरवावे. मिडीयम आचेवर दोन्ही बाजूनी तेल सोडत खरपूस भाजून घ्यावे. सॉस बरोबर खाण्यास द्यावे.

Comments