अंडा मसाला फ्राय / egg masala fry




साहित्य -

१. अंडी ५
२. कढीपत्ता १० पाने
३. लसूण पाकळ्या १०
४. तिखट अर्धा चमचा
५. धनेपूड अर्धा चमचा
६. जिरेपूड अर्धा चमचा
७. मीठ चवीनुसार
८. उडीद डाळ एक चमचा
९. जिरे पाव चमचा
१०. कोथिंबीर सजवण्याकरता
११. तेल २ चमचे 

कृती - 

अंडी उकडून, सोलून घ्यावी. त्याचे अर्धे काप करावे. एका भांड्यात तेल गरम करून त्यात जिरे तडतडू द्यावे. त्यात सालीसकट लसूण पाकळ्या थोड्या ठेचून टाकाव्या. कढीपत्ता, तिखट, धणेपूड, जिरेपूड, उडीद डाळ, मीठ टाकून अर्ध्या मिनिटानी अंडी टाकून अलगद हलवून मिक्स करून घेणे. अंड्यांना सगळीकडे मसाला लागल्यावर gas बंद करून कोथिंबीर पेरून सर्व्ह करावे. 

Comments