लेट्युस सूप / lettuce soup
साहित्य -
१. लेट्युसची पाने १२-१३
२. लसूण पाकळ्या ४
३. आले एक छोटा तुकडा
४. मिरपूड एक चमचा
५. ओलिव्ह ऑईल ३ चमचे
६. बटर २ चमचे
७. मीठ चवीनुसार
८. कोथिंबीर सजवण्याकरिता
९. इटालीयन सिझनिंग २ चमचे
१०. कांदा एक
कृती –
लेट्युसची पाने धुवून
स्वच्छ करून घ्यावी. एका नॉनस्टिक भांड्यात तेल गरम करून त्यात आले, लसूण, कांदा
बारीक चिरून टाकावा. कांदा लालसर झाल्यावर लेट्युसची पाने चिरून टाकावी. मिडीयम
आचेवर ५ मिनिटे शिजू द्यावे. शिजल्यावर थंड करून मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी.
नॉनस्टिक भांड्यात बटर टाकून वरील पेस्ट टाकावी. जेवढे पातळ करायचे असेल तेवढे
पाणी टाकावे. मीठ, मिरपूड, इटालीयन सिझनिंग टाकून २-३ मिनिटे उकळून घ्यावे. वरून
कोथिंबीर पेरून गरम सर्व्ह करावे.
Comments
Post a Comment