चिकन ६५ / chicken 65
साहित्य -
१. बोनलेस चिकन ४०० ग्रॅम
२. तांदुळाचं पीठ २ चमचे
३. कॉर्नफ्लोअर ३ चमचे
४. मीठ चवीनुसार
५. हिरव्या मिरच्या ५
६. कढीपत्ता १० पाने
७. अजिनोमोटो पाव चमचा
८. चिली गार्लिक सॉस ४ चमचे
९. लसूण ७-८ पाकळ्या
१०. आले एक छोटा तुकडा
११. आले लसूण पेस्ट २ चमचे
१२. घट्ट दही अर्धी वाटी
१३. तिखट १ चमचा
१४. मिरपूड एक चमचा
१५. अंड एक
१६. अर्ध्या लिंबाचा रस
१७. तेल तळण्यासाठी
कृती –
चिकन स्वच्छ धुवून पूर्ण
पाणी निथळून घेणे. त्याचे छोटे छोटे तुकडे करणे. त्यात दही, तिखट, मीठ, मिरपूड,
लिंबाचा रस, आले लसूण पेस्ट, ४ कढीपत्त्याची पाने तोडून टाकावी. अंड फोडून टाकावे.
तांदुळाचे पीठ, कॉर्नफ्लोअर टाकावे. सर्व एकत्र करून अर्धा तास मुरण्यास ठेवावे.
एका कढईत तेल तापवून चिकन चे तुकडे मिडीयम आचेवर ब्राऊन तळून घ्यावे. एका भांड्यात
३ चमचे तेल तापवून त्यात कढीपत्ता, मिरच्या उभ्या चिरून टाकाव्या. लसूण व आले
बारीक चिरून टाकावे. आता तळलेले चिकनचे तुकडे टाकून वरून सॉस, अजिनोमोटो, थोडेसे
मीठ, टाकावे. २ वाटी पाणी टाकून पाणी आटेपर्यंत शिजू द्यावे. कोरडे झाल्यावर गरम
सर्व्ह करावे.
Comments
Post a Comment