चिकन मलाई कबाब / chicken malai kabab
साहित्य -
१. चिकन लेग पीस ४
२. फ्रेश क्रीम ३ चमचे
३. घट्ट दही ३ चमचे
४. गरम मसाला एक चमचा
५. अर्ध्या लिंबाचा रस
६. बारीक चिरलेली पुदिन्याची
पाने ७-८
७. धणेपूड एक चमचा
८. तिखट अर्धा चमचा
९. आले लसूण पेस्ट २ चमचे
१०. कसुरी मेथी अर्धा चमचा
११. मीठ चवीनुसार
१२. साजूक तूप
आवश्यकतेनुसार
कृती -
चिकन स्वच्छ धुवून पूर्ण
पाणी निथळून घेणे. कोरडे झाल्यावर सर्व पीसला दोन्ही बाजूने ३-३ तिरप्या चिरा
मारणे. वरील सर्व साहित्य (साजूक तूप वगळून) एकत्र करून चिकनला लावून घेणे.
चिकनच्या चीरांमध्येसुद्धा भरणे. आता हे चिकन झाकून फ्रीज मध्ये कमीत कमी १२
तासांकरता ठेवणे. मग तंदूर वरती दोन्ही बाजूंनी भाजतांना तूप सोडत राहणे. चिकन
शिजल्यावर परत एकदा थोडे तूप टाकून सर्व्ह करणे.
Comments
Post a Comment