५ पेपर पनीर डोसा / 5 pepper paneer dosa
साहित्य -
१. डोस्याचे पीठ अर्धा किलो
२. पनीर एक पाव
३. शिमला मिरची लाल, पिवळी,
हिरवी प्रत्येकी अर्धी वाटी
४. हिरवी मिरची ५
५. लाल तिखट एक चमचा
६. चिली गार्लिक सॉस २ चमचे
७. मीठ चवीनुसार
८. तेल ३ चमचे
९. जिरे अर्धा चमचा
१०. धणेपूड १ चमचा
११. कोथिंबीर अर्धी वाटी
१२. किसलेले चीज
सजवण्याकरता
कृती –
एका कढईत तेल तापवून त्यात
जिरे तडतडू देणे. त्यात हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकणे. मग धणेपूड, तिखट, सर्व
शिमला मिरच्या टाकून ३ मिनिटे परतवून घेणे. आता पनीरचे चौकोनी छोटे तुकडे करून
टाकणे. मीठ व चिली गार्लिक सॉस टाकणे. १ मिनिटांनी gas बंद करून कोथिंबीर टाकणे.
डोस्याच्या पीठाचे डोसे बनवून हा मसाला त्यात भरून चीजने सजवून सर्व्ह करणे.
Comments
Post a Comment