मेथीचे शेंगोळे / methi shengole




साहित्य -

१. मेथी १ वाटी
२. बेसन २ चमचे
३. कणिक एक वाटी
४. ज्वारीचे पीठ अर्धी वाटी
५. बाजरीचे पीठ अर्धी वाटी
६. गरम मसाला दीड चमचा
७. कढीपत्ता ५-६ पाने
८. तिखट आवश्यकतेनुसार
९. धणेपूड १ चमचा
१०. जिरेपूड १ चमचा
११. आले लसूण पेस्ट २ चमचे
१२. ओवा अर्धा चमचा
१३. कसुरी मेथी १ चमचा
१४. तेल ४ चमचे
१५. कोथिंबीर अर्धी वाटी
१६. मीठ चवीनुसार
१७. मोहरी पाव चमचा
१८. जिरे पाव चमचा
१९. हळद अर्धा चमचा 

कृती -

ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ, कणिक, बेसन पीठ एकत्र करावे. त्यात मेथी एकदम बारीक चिरून टाकावी. तिखट, मीठ, ओवा, पाव चमचा हळद, एक चमचा आले लसूण पेस्ट टाकावी. पाण्याने घट्ट गोळा भिजवावा. एकदम छोटे छोटे गोळे घेऊन त्यांना कडबोळी सारखा आकार द्यावा. असे सर्व शेंगोळे तयार करून घ्यावे. एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता तडतडू द्यावा. आता त्यात गरम मसाला, तिखट, धणेपूड, जिरेपूड, एक चमचा आले लसूण पेस्ट, पाव चमचा हळद टाकून gas बारीक करून २-३ मिनिटे परतावे. मग आवश्यकतेनुसार पाणी टाकून पाणी उकळल्यावर त्यात मीठ व शेंगोळे टाकावे. ज्या भांड्यात शेंगोळ्याची कणिक भिजवली त्या भांड्यात थोडे पाणी टाकून ढवळून ते पाणी उकळत्या पाण्यात टाकावे. त्याने रस्सा घट्ट होण्यास मदत होते. कसुरी मेथी टाकून ७-८ मिनिटे शेंगोळे शिजेपर्यंत शिजवणे. शिजल्यावर gas बंद करून कोथिंबीर पेरून गरम सर्व्ह करावे.

Comments