दुधीचे भरीत / bottle gourd mash




साहित्य –

१. दुधी भोपळा एक मिडीयम साईझचा
२. कांदे २
३. आले लसूण पेस्ट
४. सुक्या लाल मिरच्या २
५. हिरव्या मिरच्या ३
६. चिली फ्लेक्स १ चमचा
७. कोथिंबीर अर्धी वाटी
८. जिरे अर्धा चमचा
९. गरम मसाला १ चमचा
१०. तिखट आवश्यकतेनुसार
११. मीठ चवीनुसार
१२. धणेपूड १ चमचा
१३. तेल आवश्यकतेनुसार चमचे 

कृती –

दुधी भोपळा धुवून बारीक किसणीने किसून घ्यावा. कांदे उभे चिरून तेलात ब्राऊन तळून घेऊन बाजूला ठेवावे. एका कढईत ३ चमचे तेल तापवून त्यात जिरे तडतडू द्यावे. त्यात सुक्या लाल मिरच्या, आले लसूण पेस्ट टाकून थोडे परतावे. गरम मसाला, धणेपूड, तिखट, चिली फ्लेक्स टाकावे. आता त्यात तळलेल्या कांद्यांमधील अर्धे कांदे, किसलेला भोपळा, मीठ टाकून मिडीयम आचेवर २ मिनिटे परतावे. आता बारीक gas वर १० ते १५ मिनिटे भोपळा शिजेपर्यंत परतत राहावे. शिजल्यावर हिरव्या मिरच्या चिरून टाकाव्या. १ मिनिटांनी gas बंद करून कोथिंबीर पेरावी. सर्व्ह करतांना उरलेला अर्धा कांदा वरून टाकावा. पराठ्यांबरोबर खाण्यास द्यावे.   

Comments