कोरीयंडर चिकन / coriander chicken
साहित्य –
१.
कोथिंबीर ३ वाटी
२.
कढीपत्ता १० पाने
३.
मिरच्या ७-८
४.
आले लसूण पेस्ट २ चमचे
५.
फाय स्पाईस मसाला १ चमचा
६.
चिकन अर्धा किलो
७.
खसखस पाव वाटी
८.
सुक्या खोबऱ्याचा कीस ३ चमचे
९.
धनेपूड ३ चमचे
१०.
जिरे १ चमचा
११.
तेल ५ चमचे
१२.
हळद एक चमचा
१३.
मीठ चवीनुसार
१४.
दही १ वाटी
कृती –
चिकनचे
पीस स्वच्छ धुवून घेणे. त्याला हळद व थोड मीठ लावून अर्धा तास मुरण्यास ठेवावे.
एका मिक्सरच्या भांड्यात कढीपत्ता, कोथिंबीर, मिरच्या, थोडे पाणी टाकून बारीक
वाटून घेणे. खसखस मध्ये १ वाटी पाणी टाकून मिक्सर मध्ये २-३ मिनिटांपर्यंत फिरवत
राहणे. मग त्यात खोबरं टाकून परत २ मिनिटे वाटून घेणे. एका नॉनस्टिक भांड्यात तेल
तापवून त्यात जिरे तडतडू देणे. आता धणेपूड टाकून आले लसूण पेस्ट टाकणे. मग
कोथिंबीरीची पेस्ट टाकून ३ मिनिटे भाजणे. खसखसची पेस्ट टाकून हळद, मसाला टाकावा.
झाकण ठेऊन पाणी आटेपर्यंत शिजू देणे. दही टाकून परत २ मिनिटे होऊ द्यावे. मग
चिकनचे पिसेस, मीठ टाकून झाकण ठेवावे. चिकन शिजल्यावर gas बंद करून भाकरी किंवा
राईस बरोबर सर्व्ह करावे.
Comments
Post a Comment