अंडा भुर्जी करी / scrambled egg curry




साहित्य -

१. अंडी ४
२. कांदे २
३. आले लसूण पेस्ट १ चमचा
४. टमाटा १
५. फ्रेश क्रीम अर्धी वाटी 
६. मीठ चवीनुसार
७. गरम मसाला अर्धा चमचा
८. तिखट आवश्यकतेनुसार
९. कोथिंबीर अर्धी वाटी
१०. तेल आवश्यकतेनुसार
११. कसुरी मेथी एक चमचा
१२. जिरे अर्धा चमचा 

कृती -

एका भांड्यात एक चमचा तेल तापवून त्यात चिरलेला कांदा परतावा. २ मिनिटांनी त्यात आले लसूण पेस्ट व चिरलेला टमाटा टाकावा. ३-४ मिनिटे परतावे. एक वाटी पाणी टाकून २ मिनिटे शिजू द्यावे. काढून घेऊन थंड करावे. मिक्सरला बारीक पेस्ट करावी. एका भांड्यात ३ चमचे तेल तापवून त्यात जिरे तडतडू देणे. मग त्यात तिखट, गरम मसाला, वरील पेस्ट टाकून २-३ मिनिटे शिजू द्यावे. मग कसुरी मेथी, मीठ, फ्रेश क्रीम टाकावे. २ वाटी पाणी टाकावे. शिजू द्यावे. एका तव्यावर एक चमचा तेल पसरवून गरम करण्यास ठेवावे. सर्व अंडी एका बाऊल मध्ये फोडून घ्यावी. थोडेसे मीठ टाकावे.  अलगद तव्यावर टाकावे. १५ सेकंद अंडी हलवत राहावी. अंडी पूर्णपणे शिजू देऊ नये. कचवट राहू देणे. आणि लगेच करी मध्ये सोडणे. हवे असल्यास डावानेच तुकडे करणे. gas पटकन बंद करून ब्रेड स्लाईसेस बरोबर कोथिंबीर पेरून गरम सर्व्ह करणे.    

Comments