भापा चींगरी / bhapa chingri




साहित्य -

१. कोळंबी अर्धा किलो
२. कांदा एक छोटा
३. मोहरी २ चमचे
४. खसखस १ चमचा
५. मोहरीचे तेल ६ चमचे
६. हळद अर्धा चमचा
७. नारळाचे दुध अर्धी वाटी
८. हिरव्या मिरच्या ५ 
९. मीठ चवीनुसार 

कृती -

कोळंबी स्वच्छ धुवून घ्यावी. कुकरच्या भांड्यात घेऊन त्यात कांदा चिरून टाकावा. खसखस, मोहरी, ३ मिरच्या ह्यांची बारीक पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट कोळंबीमध्ये टाकावी. मीठ, नारळाचे दुध, तेल, हळद, २ मिरच्या उभ्या चिरून टाकाव्या. सर्व व्यवस्थित एकत्र करून कुकर मध्ये ३ शिट्या करून वाफवून घ्यावे. भाताबरोबर गरम सर्व्ह करावे.

Comments