व्हेज मोमोज / veg momos
साहित्य-
१. मैदा १ वाटी
२. मीठ चवीनुसार
३. मिरच्या ४
४. पत्ता कोबी ३ वाट्या
५. कांदा १ मोठा
६. सोया सॉस २ चमचे
७. अजिनोमोटो पाव चमचा
८. गाजर पाऊण वाटी
९. तेल २ चमचे
१०. लसूण पाकळ्या ५-६
११. आले एक छोटा तुकडा
१२. कोथिंबीर पाव वाटी
१३. पाणी आवश्यकतेनुसार
कृती-
मैद्यात मीठ घालून ढवळून पाण्याने गोळा भिजवणे. तेलाचा हात लाऊन परत एकदा मळून घेणे. त्यावर पातळ ओले कापड ठेऊन अर्ध्या तासासाठी ठेऊन देणे. मिरच्या, लसूण, आले, कोबी, कांदा बारीक चिरून ठेवणे. एका कढईत तेल घेऊन त्यात मिरच्या होऊ देणे. मग लसूण व आले होऊ देणे. कांदा टाकून चांगला परतून घेणे. आता कोबी, गाजर टाकून २ मिनिटे परतणे. सोया सॉस, अजिनोमोटो, मीठ, घालून चांगले ढवळणे. कोथिंबीर घालून gas बंद करून मिश्रण थंड होऊ द्यावे.
मोठ्या पातेल्यात पाव भाग पाणी घेऊन चाळणीला आतील बाजूस तेल लावून त्यावर ठेवावी. मोठ्या gas वर पातेले ठेवून द्यावे. मैद्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून त्यात सारण भरून मोदकासारखा आकार देणे. (मोमोज वेगवेगळ्या आकारात असतात. त्याला हवा तो आकार द्यावा) सर्व मोमोज तयार केल्यावर त्या चाळणीवर ठेवावे. व वरून ताटाने झाकावे. १०-१५ मिनिटाने मोमोज काढून गरम गरम शेजवान सॉस बरोबर खाण्यास द्यावे.
Comments
Post a Comment