गोड अप्पे / sweet appe
साहित्य-
१. रवा १ वाटी
२. गुळ पाऊण वाटी
३. ओले खोबरे अर्धी वाटी
४. पिवळा रंग पाव चमचा
५. काजूचे तुकडे पाव वाटी
६. साजूक तूप पाव वाटी
७. मीठ २ चिमुट
८. वेलची पूड पाव चमचा
कृती-
रवा भाजून घ्यावा. १ वाटी पाण्यात गुळ विरघळवून घ्यावा. त्यात रवा गरम असतानाच टाकावा. ओले खोबरे किसून त्यात टाकावे. बाकीचे सर्व साहित्य टाकून एकत्र करून घ्यावे. १ तास झाकून ठेवावे. अप्पे पात्र गरम करून त्यात तूप सोडून मिश्रण भरावे. झाकण ठेऊन ५ मिनिटे मंद gas वर होऊ द्यावे. झाकण काढून चमच्याने अलगद उलटवून घ्यावे. परत थोडेसे तूप सोडून झाकण न ठेवताच ३-४ मिनिटे होऊ द्यावे. अप्पे काढून खायला देताना त्यावर तूप सोडावे.
Comments
Post a Comment