आंबा नारळ वड्या / mango coconut barfi


साहित्य-
१. नारळ १
२. आंबे २
३. साखर १ १/२ वाटी
४. जायफळ पूड पाव चमचा
५. वेलची पूड पाव चमचा

कृती-
नारळ किसून घेणे. आंब्याचा गर काढून मिक्सर मध्ये फिरवून बारीक करणे. आता सर्व साहित्य एकत्र करून gas वर मिडीयम आचेवर शिजू देणे. शिजताना ढवळत राहणे. एका ताटाला, लाटण्याला व सुरीला तूप लावून ठेवणे. मिश्रणाचा चांगला घट्ट गोळा झाला की काढून ताटावर ठेऊन लाटणे. मग त्याच्या वड्या पाडणे. थंड झाल्यावर वड्या काढून घेणे.

Comments