टमाटे नारळ वड्या / tomato coconut burfi
साहित्य-
१. ओला नारळ १
२. टमाटे ३
३. साखर दीड वाटी
४. वेलचीची पूड अर्धा चमचा
५. जायफळ पूड अर्धा चमचा
६. तूप आवश्यकतेनुसार
कृती-
नारळ किसून घेणे. टमाटे चिरून मिक्सर मध्ये फिरवून बारीक करणे व गाळून घेणे. आता सर्व साहित्य एकत्र करून gas वर मिडीयम आचेवर शिजू देणे. शिजताना ढवळत राहणे. एका ताटाला, लाटण्याला व सुरीला तूप लावून ठेवणे. मिश्रणाचा चांगला घट्ट गोळा झाला की काढून ताटावर ठेऊन लाटणे. मग त्याच्या वड्या पाडणे. थंड झाल्यावर वड्या काढून घेणे.
टीप-
टमाटे शक्यतोवर आंबट घेणे. म्हणजे वड्या आंबट गोड होतात.
Comments
Post a Comment