कॉर्न चाट / corn chat
साहित्य-
१. स्वीट कॉर्न कणीस १
२. कांदा १
३. tomato १
४. कोथिंबीर अर्धी वाटी
५. बटाटा १
६. जाड शेव १ वाटी
७. पुदिना (आवडत असल्यास) पाव वाटी
८. चाट मसाला १ चमचा
९. मिरपूड २ चमचे
१०. मीठ चवीनुसार
११. लिंबू १
कृती-
कणीस व बटाटा कुकरमध्ये उकडत लावावा. ३-४ शिट्ट्या झाल्यावर कणसाचे दाणे काढून घ्यावे व बटाटा कुस्करून घ्यावा. कांदा, tomato , कोथिंबीर, पुदिना बारीक चिरून कॉर्न मध्ये टाकावा. आता बटाटा, चाट मसाला, मिरपूड, मीठ, लिंबू टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. वेळेवर खायला देताना त्यात शेव मिक्स करून द्यावी.
Comments
Post a Comment