थालीपीठ / thalipith


साहित्य-
१. चकलीची भाजणी अर्धी वाटी
२. ज्वारीचे पीठ १ वाटी
३. बेसन ३ चमचे
४. कणिक १ वाटी
५. कांदे २
६. tomato २
७. तीळ ३ चमचे
८. कसुरी मेथी ३ चमचे
९. जिरेपूड १ चमचा
१०. मीठ चवीनुसार
११. हळद अर्धा चमचा
१२. तिखट आवडीनुसार
१३. तेल पाव वाटी
१४. पाणी भिजवण्यासाठी
१५. कोथिंबीर अर्धी वाटी
१६. लसूण पाकळ्या ७-८
 
कृती-
सर्व पीठे एका बाउल मध्ये घेऊन त्यात जाड चिरलेला कांदा, tomato , कोथिंबीर टाकावे. लसूण कुटून टाकावे. तीळ, कसुरी मेथी, जिरेपूड, मीठ, हळद, तिखट, २ चमचे तेल, टाकून चांगले एकत्र करून घ्यावे. आता पाणी टाकून त्याचा कणकेपेक्षा थोडा पातळ गोळा बनवून घ्यावा. एका प्लास्टिक च्या पिशवीला तेल लावून घ्यावे. पोळीच्या गोळ्याच्या दुप्पट गोळा घेऊन त्या पिशवीवर गोलाकार थापावा. व मधोमध बोटाने छिद्र पडावे. (थापताना हाताला पाणी लावून घ्यावे. म्हणजे गोळा हाताला चिकटणार नाही) तव्यावर अर्धा चमचा तेल सोडून थालीपीठ टाकावे. मंद gas वर झाकण ठेऊन होऊ द्यावे. ५ मिनिटांनी झाकणावरील  पाणी तव्यावर पडण्याचा आवाज आल्यावर एका बाजूने झाले असे समजावे. झाकण काढून थालीपीठ पलटवून घ्यावे. gas थोडा मोठा करावा. २ मिनिटाने काढून घ्यावे. गरम गरम थालीपीठ साईच्या दह्याबरोबर किंवा लोण्याबरोबर सर्व्ह करावे.
 
टीप-
थालीपीठात उरलेले वरण, भात, भाजी काहीही टाकले तर जास्त चवदार लागते.

Comments