पुऱ्यांचे लाडू / puri laddu


साहित्य-
१. बेसन १ ग्लास
२. साखर सव्वा ग्लास
३. जायफळ, वेलचीची पूड १ चमचा
४. काजूचे तुकडे अर्धी वाटी
५. मनुका पाव वाटी
६. साजूक किंवा डालडा तूप  तळण्यासाठी
७. पाणी आवश्यकतेनुसार

कृती-
प्रथम बेसन पाण्याने घट्ट भिजवून घ्यावे. त्याच्या पुऱ्या लाटून तेलात तळून घ्याव्या. त्या पुऱ्या मिक्सर मध्ये एकदम बारीक वाटून घ्याव्या. आता साखरेचा पाक करण्यासाठी एका भांड्यात साखर घेऊन ती भिजेल इतके पाणी टाकून gas वर ठेवावे. पाक गोळीबंद होऊ द्यावा. त्यात काजूचे तुकडे, मनुका, जायफळ - वेलचीची पूड टाकून ढवळून घ्यावे. gas बंद करावा. पुऱ्यांचा चुरा पाकात टाकावा. हे मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे.  थोडे घट्ट झाले की लाडू करण्यास घ्यावे. ( हे लाडू नागपंचमीच्या सणाला करतात ). 

Comments