मेदू वडे / medu vada



साहित्य-
वडे-
१. उडीद डाळ २ वाट्या
२. मेथी दाणे अर्धा चमचा
३. मीठ चवीनुसार
४. तेल तळण्यासाठी
५. लसूण १० पाकळ्या
६. मिरच्या १२
सांबार-
१. तूर डाळ १ वाटी
२. फुल कोबी पाव वाटी
३. भेंडी २
४. लाल भोपळा पाव वाटी
५. कढीपत्ता ७-८ पाने
६. मीठ चवीनुसार
७. तिखट चवीनुसार
८. tomato
९. कांदा १
१०. लसूण पाकळ्या ५
११. आले एक छोटा तुकडा
१२. हळद पाव चमचा
१३. मोहरी पाव चमचा
१४. जिरे पाव चमचा
१५. मिरच्या ३-४
१६. चिंचेचा कोळ पाव वाटी
१७. खवलेले ओले खोबरे पाव वाटी
१८. कोथिंबीर पाव वाटी
१९. वांगी २
२०. तेल पाव वाटी
२१. सांबार मसाला १ चमचा
चटणी-
१. ओले खोबरे अर्धी वाटी
२. हरबरा डाळ ३ चमचे
३. कढीपत्ता ५ पाने
४. मोहरी पाव चमचा
५. जिरे पाव चमचा
६. हिंग पाव चमचा
७. मीठ चवीनुसार
८. मिरच्या ६
९. साखर अर्धा चमचा
१०. लिंबाचा रस १ चमचा 
कृती-
आदल्या रात्री उडदाच्या डाळीत मेथी दाणे टाकून धून घ्यावी व भिजवून ठेवावी.
दुसऱ्या दिवशी त्यातील सर्व पाणी काढून टाकावे. व मिक्सर मध्ये फिरवावी. शक्यतोवर फिरवताना पाणी टाकू नये. जर डाळ बारीक होत नसेल तरच अगदी थोडे पाणी घालावे. मिश्रण पातळ होता कामा नये. जोपर्यंत डाळ बारीक होत नाही तोपर्यंत मिक्सर च्या भांड्यात चमचा घालून डाळ खाली वर करत राहावी. त्यात लसूण, मिरचीची पेस्ट करून टाकावी. मीठ टाकून मिश्रण ढवळून २ तासांसाठी झाकून ठेवावे.
कुकर मध्ये तूर डाळ शिजवून घ्यावी. सर्व भाज्यांचे छोटे तुकडे करून घ्यावे. tomato , मिरच्या चिरून घ्याव्या. कांदा लंबा चिरावा. लसूण, आल्याची पेस्ट करून घ्यावी.  एका पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता तडतडू द्यावा. मग मिरच्या, कांदा टाकून परतवून घ्यावा. आता tomato व सर्व भाज्या टाकाव्या. हळद, तिखट, सांबार मसाला, लसूण आल्याची पेस्ट टाकावी. आता झाकण ठेऊन मंद gas वर भाज्या शिजू द्याव्या. १-२ वाफ काढल्यावर त्यात शिजवलेली तूर डाळ, चिंचेचा कोळ टाकावा. आवश्यकतेनुसार पाणी टाकावे. निट ढवळून एक उकळी येऊ द्यावी. मग मीठ, कोथिंबीर व ओले खोबरे टाकून gas बंद करावा.
चटणीकरता ओले खोबरे, हरबरा डाळ, मीठ, मिरच्या, साखर, लिंबाचा रस मिक्सर मध्ये फिरवून घ्यावे. कढल्यात तेल तापवावे. त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता तडतडू द्यावे. मग हिंग घालून gas बंद करावा. ही फोडणी चटणीत टाकावी.
मेदू वडे करण्यासाठी वड्याचे मिश्रण घ्यावे. एका वाटीत पाणी घ्यावे. कढईत तेल तापत ठेवावे. आता दोन्ही हातांचे तळवे पाण्याने ओले करावे. डाव्या हातावर एका पोळीच्या गोळ्याएवढा गोळा घेऊन त्याला उजव्या हाताने थोडा चपटा व गोल आकार देऊन त्याला मधोमध छिद्र पडावे. हा गोळा उजव्या हाताच्या बोटांवर घेऊन अलगद तेलात सोडवा. अश्याप्रकारे सर्व वडे दोन्ही बाजूनी चांगले तळून घ्यावे. गरम गरम सांबार व चटणी बरोबर खाण्यास द्यावे.

Comments