फ्रुट योगर्ट आईस्क्रीम / fruit yogurt icecream


साहित्य-
१. आंबा २ 
२. केळे १
३. दही (आंबट नसलेले) ३ वाट्या
४. साखर ६ चमचे
५. काजू ५
६. बदाम ४

कृती-
आंबा व केळ्याचे साल काढून तुकडे करून फ्रीजर मध्ये ठेवावे. दही फडक्यात घेऊन त्यातील पाणी काढून टाकावे. थोडेसे दाबून घ्यावे. आंबा व केळे कडक झाल्यावर मिक्सर मध्ये त्यातील संपूर्ण केळे व दीड आंबा घेऊन त्यात दही, साखर टाकून फिरवावे. त्यात बदाम व काजूचे तुकडे मिक्स करून हे मिश्रण परत फ्रीजर मध्ये सेट करायला ठेवावे. सेट झाल्यावर सेर्व्हिंग प्लेट मध्ये काढून त्यावर उरलेला आंबा अर्धा सेंटीमीटर प्रमाणे बारीक चिरून त्यावर टाकावा. वाटल्यास थोडे काजू, बदाम सजवण्याकरिता टाकावे. 

Comments