अंडा पराठा / egg paratha


साहित्य-
१. अंडी ४
२. कांदा १ मोठा
३. मिरच्या ५
४. लसूण ५ पाकळ्या
५. धने १ चमचा
६. बडीशेप १ चमचा
७. लिंबू अर्धे
८. कोथिंबीर अर्धी वाटी
९. मीठ चवीनुसार
१०. तेल २ चमचे
११. कणिक १ वाटी
१२. मैदा १ वाटी
१३. पाणी आवश्यकतेनुसार
१४. मोहरी पाव चमचा
१५. जिरे पाव चमचा
१६. हळद पाव चमचा 

कृती-
मैदा व कणकेत मीठ टाकून पाण्याने भिजवून अर्ध्या तासाकरिता बाजूला ठेवावे. लसूण, मिरची, धने, बडीशेप मिक्सर मध्ये बारीक करावे. एका पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे तडतडू द्यावे. मग कांदा लालसर होऊ द्यावा. त्यात वाटलेला मसाला व हळद टाकून १ मिनिट होऊ द्यावे. आता अंडी टाकून ढवळत राहावे (गुठळ्या होऊ देऊ नये). अंडी मोकळी झाल्यावर त्यात मीठ, लिंबू, व कोथिंबीर एकत्र करून gas बंद करावा. व मिश्रण थंड होण्यास ठेऊन द्यावे.
भिजवलेल्या कणकेतील पोळीपेक्षा दुप्पट आकाराचा गोळा घेऊन त्यात पुर्णाप्रमाणे अंड्याचे सारण भरून जाडसर लाटावे. व तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूनी भाजून घ्यावे. सॉस किंवा दह्याबरोबर खाण्यास द्यावे.

Comments