घरगुती पिझ्झा / homemade pizza (without microwave)
साहित्य-
पिझ्झा बेस-
१. मैदा १ १/२ वाटी
२. मीठ अर्धा चमचा
३. यीस्ट २ चमचे
४. बेकिंग पावडर १ चमचा
५. पाणी आवश्यकतेनुसार
६. बटर २ चमचे
पिझ्झा टोपिंग्स -
१. tomato १
२. कांदा १
३. शिमला मिरची १
४. tomato सॉस ६ चमचे
५. मेओनीज सॉस ४ चमचे
६. चीज २ क्युब्ज
७. तेल १ चमचा
कृती-
यीस्ट आणि बेकिंग पावडर अर्धी वाटी कोमट पाण्यात ढवळून घेणे. मैद्यात टाकून त्यात मीठ व आवश्यकतेनुसार कोमट पाणी घेऊन कणकेसारखा गोळा करून घेणे. १ तास झाकून ठेवणे. मग त्याचे २ गोळे करून एका गोळ्याची जाडसर पोळी लाटणे. नॉनस्टिक तव्यावर एक चमचा बटर लावून त्यावर ती पोळी टाकून झाकण ठेऊन एकदम बारीक gas वर १५ मिनिटे होऊ देणे. काढून बाजूला ठेवणे. मग असाच दुसरा बेस करून घेणे.
आता कांदा, शिमला मिरची हवी त्या आकारात कापून घेणे. tomato कापताना त्याचा गर काढून टाकणे. एक चमचा तेलावर बाज्या थोड्याश्या फ्राय करून घेणे. काढून घेणे. तयार केलेल्या बेस वर tomato सॉस लावून वर मेओनीज सॉस लावून पसरवून घेणे. अर्धे चीज चे क्यूब त्यावर सगळीकडे किसून टाकणे. आता भाज्या पसरवून परत उरलेले अर्धे क्यूब किसून टाकणे. हा पिझ्झा परत तव्यावर बारीक gas वर झाकण ठेऊन होऊ देणे. ३-४ मिनिटांनी काढून घेणे. गरम गरम कापून खायला देणे.
Comments
Post a Comment