आंबट घाऱ्या / khatti ghari


साहित्य-
१. भगर पाव वाटी
२. कणिक २ वाट्या
३. लसूण पाकळ्या 7
४. दही ३ चमचे
५. मिरच्या ५
६. आले एक छोटा तुकडा
७. मीठ चवीनुसार
८. तेल तळण्यासाठी
९. कोथिंबीर अर्धी वाटी
१०. हळद अर्धा चमचा

कृती-
आदल्या रात्री भगर धून कुकरमध्ये किंवा भांड्यात पाणी टाकून शिजवून घेणे. भगरीचा भात तयार झाला की त्यात कणिक, मीठ, हळद, दही टाकणे. लसूण, मिरची, कोथिंबीर व आल्याची पेस्ट करून टाकणे. व हाताने चांगले मिक्स करून घेणे.  मेदू वड्याच्या पीठाइतपत पातळ करणे. जेणेकरून हातावर थापता येईल. रात्रभर आम्बवण्यास ठेऊन देणे.  दुसऱ्या दिवशी सकाळी एका वाटीत पाणी घेणे. कढईत तेल तापवणे. वाटीतील पाणी दोन्ही हाताना लावून घेणे. डाव्या हातावर मिश्रणाचा एक गोळा घेऊन तो गोल थापणे. पुरीपेक्षा जाड व छोटा आकार करावा. आता अलगद तेलात सोडवा. gas मिडीयम आचेवर असावा. ह्या पुऱ्या हळूहळू फुलायला व कडेने सुटायला लागल्या की अलगद पलटवून घ्याव्या. व लालसर काढाव्या. आंबट घाऱ्या नुसत्याच खायला छान लागतात.

Comments