पांढरा ढोकळा / white dhokla




साहित्य -  

१. उडीद डाळ १ वाटी
२. तांदूळ २ वाट्या
३. इनो सोडा १ पाकीट
४. तेल २ चमचे
५. साखर २ चमचे
६. ताक १ वाटी
७. हिरव्या मिरच्या ८
८. आले एक छोटा तुकडा
९. कोथिंबीर सजवण्यासाठी
१०. तेलाची फोडणी अर्धी वाटी 

कृती - 

दुपारी उडीद डाळ व तांदूळ वेगवेगळे भिजत घालावे. रात्री मिक्सरला एकत्र बारीक वाटून त्यात ताक घालून झाकून ठेवावे. सकाळी आले, मिरच्या मिक्सर मध्ये फिरवून त्याची पेस्ट मिश्रणात टाकावी. साखर, मीठ टाकून चांगले मिक्स करून घेणे. ढोकळ्याच्या भांड्याला आतून तेल लावून घेणे. एका पातेल्यात पाणी तापत ठेवणे. भांड्यावर चाळणी ठेवणे. आता ढोकळ्याच्या मिश्रणात इनो टाकून पटकन ढवळून चांगले एकत्र करणे. व लगेच ढोकळ्याच्या भांड्यात ओतून भांडे चाळणीवर ठेवावे. वरून ताट झाकावे. १२-१५ मिनिटे मोठ्या आचेवर शिजू देणे. खाली उतरवून चौकोनी काप पाडून पाव वाटी पाणी ढोकळ्यावर सगळीकडे पसरवून टाकणे. फोडणी व कोथिंबीर पेरून सर्व्ह करणे.    

Comments