मखाणा खीर / makhana kheer




साहित्य -  

१. मखाणे ३ वाटी
२. फुल क्रीम दुध दीड लिटर
३. साखर १ वाटी
४. बदाम पाव वाटी
५. पिस्ता पाव वाटी
६. केशर १० काड्या
७. वेलचीपूड अर्धा चमचा 

कृती -  

कढईत मखाणे १ मिनिट भाजून घेणे. एका मखाण्याचे दोन याप्रमाणे तुकडे करून घेणे. एका मोठ्या भांड्यात दुध उकळण्यास ठेवावे. उकळल्यावर gas बारीक करून दुध अर्धे होईपर्यंत आटू द्यावे. आता त्यात साखर, मखाणे, केशर, वेलचीपूड टाकावी. बदाम व पिस्त्याचे उभे काप करून टाकावे. ५ मिनिटे शिजू द्यावे. खीर खाली उतरवून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये अजून थंड होण्यास ठेवावी व सर्व्ह करावी.

Comments