कॉर्न डोसा / corn dosa




साहित्य - 

१. एक छोटा कांदा
२. एका कणसाचे उकडलेले दाणे 
३. मिरच्या ४
४. आले एक छोटा तुकडा
५. लसूण ५ पाकळ्या
६. भिजवलेली मुगाची डाळ दीड वाटी
७. कोथिंबीर अर्धी वाटी
८. साखर एक चमचा
९. मीठ चवीनुसार
१०. मेथीची पाने १ वाटी
११. तांदूळ पीठ पाऊण वाटी 

कृती -  

मिक्सरच्या भांड्यात कांदा, मिरच्या, आले, लसूण, कॉर्न, मुगडाळ, साखर टाकून सर्व एकदम बारीक फिरवून घेणे. आवश्यकता वाटल्यास थोडे पाणी टाकावे. मिश्रण एका भांड्यात काढून त्यात तांदूळ पीठ, मीठ, मेथी व कोथिंबीर चिरून टाकावी. मिश्रण जास्त पातळ करू नये. आता डोस्याच्या तव्यावर डोसा करून खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाण्यास द्यावा.

Comments