एगलेस रेड वेल्व्हेट केक / eggless red velvet cake




साहित्य -  

१. मैदा दीड कप
२. कोको पावडर २ चमचे
३. बेकिंग पावडर १ चमचा
४. बेकिंग सोडा अर्धा चमचा
५. तेल अर्धा कप
६. दुध पाऊण कप
७. पिठीसाखर अर्धा कप
८. कंडेन्स मिल्क अर्धा कप
९. रेड फूड कलर १ चमचा
१०. व्हानिला इसेन्स १ चमचा
११. तूप ग्रीस करण्याकरता
१२. बटर पेपर 

कृती - 

ओव्हन प्रीहीट करण्यास ठेवावे. एका भांड्यात मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा एकत्र दोन वेळा चाळून घ्यावा. एका भांड्यात तेल घेऊन त्यात पिठीसाखर, कंडेन्स मिल्क टाकून बिटरने एकजीव करणे. त्यात दुध, व्हानिला इसेन्स टाकणे. आता मैदा थोडा थोडा टाकत बीट करत जाणे. २-३ चमचे दुध घेऊन त्यात कलर मिक्स करून केकच्या मिश्रणात ओतणे. हवे असल्यास अजून दुध टाकणे. थोडे पातळसर करणे. केकच्या भांड्याला आतून सगळीकडे तूप लावून घेणे. आता त्यात बटर पेपर पसरवून परत तूप लावून घेणे. केकचे मिश्रण ओतणे. आता ओव्हनमध्ये हाय स्पीड वर अर्धा पाऊण तास ठेवणे. चांगला शिजल्यास काढून घेणे. अर्धा तास थंड होऊ देणे. मग फ्रॉस्टिंग व चेरीज ने हवे तसे सजवणे.  


Comments