शेवग्याच्या शेंगांची काळ्या मसाल्यातली रस्सा भाजी ( drumstick in black masala curry)

साहित्य - 

१. शेवग्याच्या शेंगा १ पाव 

२. सुक्या खोबऱ्याचा किस ३ चमचे

३. एक कांदा

४. तिखट हिरव्या मिरच्या ५ 

५. आले एक छोटा तुकडा

६. लसूण पाकळ्या ५-६ 

७. कोथिंबीर १ वाटी

८. मिरे ५

९. लवंग ३ 

१०. शहाजीरे १ चमचा 

११. तेल ५ चमचे 

१२. गरम मसाला १ चमचा

१३. तिखट चवीनुसार 

१४. मीठ चवीनुसार 

१५. डाळं २ चमचे

१६. हळद अर्धा चमचा

१७. धने २ चमचे 

१८. मोठी वेलची १


कृती - 

आधी शेंगांची साले काढून त्याचे तुकडे कापून पाण्यात ठेवाव्या. एका तव्यावर अर्धा चमचा तेल टाकून त्यावर चिरलेला कांदा चांगला काळपट भाजून घ्यावा. तसंच खोबऱ्याचा किस भाजावा. आता बाकीचा खडा मसाला भाजावा. डाळं भाजावे. सर्व थंड होऊ द्यावे. मिक्सरच्या भांड्यात थंड झालेला खडा मसाला, डाळं, खोबऱ्याचा किस याची बारीक पावडर करून घ्यावी. आता त्यातच कोथिंबीर, आले , लसूण, कांदा टाकून आवश्यकतेनुसार पाणी वापरून बारीक पेस्ट करावी. एका भांड्यात तेल तापवून त्यात वाटण टाकून तेल सुटेपर्यंत मिडियम आचेवर परतावे. आता त्यात हळद, तिखट, गरम मसाला टाकून मंद आचेवर २ मिनिटे परतावे. शेंगा, मीठ, व आवश्यकतेनुसार पाणी टाकून भाजी शिजू द्यावी. शेंगा दाबून पहाव्या. दबत असल्यास गॅस बंद करून थोडी कोथिंबीर टाकावी. गरम गरम भाकरीबरोबर सर्व्ह करावी. 

Comments

Popular Posts