पास्ता विथ कॅप्सिकम सॉस / pasta with capsicum sauce




साहित्य - 

१. पेने पास्ता २ वाट्या
२. शिमला मिरची १
३. टमाटा १
४. कांदा १
५. लसूण पाकळ्या ५
६. कोथिंबीर पाव वाटी
७. चिली फ्लेक्स १ चमचा
८. ओरेगानो १ चमचा
९. मीठ चवीनुसार
१०. मिरपूड १ चमचा
११. ऑलीव्ह ओईल ३ चमचे 

कृती -  

एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवणे. त्यात मीठ टाकून पास्ता शिजवून घेणे. पाणी वेगळे काढून ठेवणे. मिक्सर मध्ये शिमला मिरची, टमाटा, कांदा, लसूण थोडे पाणी टाकून बारीक वाटून घेणे. एका कढईत तेल तापवून त्यात वाटण टाकून २ मिनिटे परतवून घेणे. शिजलेला पास्ता टाकावा. गरम झाल्यावर थोडे मीठ, ओरेगानो, मिरपूड, चिली फ्लेक्स टाकून २ मिनिटे होऊ देणे. आवश्यकता वाटल्यास पास्ता शिजवलेले पाणी टाकावे. सर्व्ह करताना कोथिंबीर पेरावी.

Comments