ब्राऊन लेमन राईस / brown lemon rice




साहित्य -  

१. तेल ४ चमचे
२. शिजवलेला ब्राऊन राईस ३ वाटी
३. मोहरी अर्धा चमचा
४. जिरे अर्धा चमचा
५. लाल मिरच्या ४
६. उडदाची डाळ २ चमचे
७. हरबरा डाळ १ चमचा
८. कॉर्न अर्धी वाटी
९. आले पेस्ट १ चमचा
१०. कढीपत्ता १० पाने
११. हिरव्या मिरच्या ३
१२. हळद पाव चमचा
१३. साखर अर्धा चमचा
१४. एका लिंबाचा रस
१५. कोथिंबीर अर्धी वाटी
१६. मीठ चवीनुसार 

कृती -  

एका भांड्यात तेल तापवून त्यात मोहरी, जिरे तडतडू देणे. मग त्यात हिरव्या व लाल मिरच्या टाकून हरबरा व उडीद डाळ टाकणे. आल्याची पेस्ट, कढीपत्ता, कॉर्न टाकून २ मिनिटे शिजवून घेणे. आता साखर, लिंबाचा रस, हळद, मीठ टाकून एकत्र करून भात टाकणे. ३-४ मिनिटे मंद आचेवर होऊ देणे. मग gas बंद करून वरून कोथिंबीर पेरून सर्व्ह करणे.

Comments