अंडा भात / egg rice


साहित्य-
१. बासमती तांदूळ २ वाट्या
२. पाणी ४ वाट्या
३. अंडी ४
४. हिरवी मिरची ५
५. कोथिंबीर वाटीभर
६. आले एक छोटा तुकडा
७. लसूण पाकळ्या ६
८. मोहरी पाव चमचा
९. जिरे पाव चमचा
१०. मिरे ८
११. लवंग ६
१२. दालचिनीचे छोटे तुकडे ४
१३. तमालपत्र ३
१४. वेलची ४
१५. tomato १
१६. कांदे ३
१७. मीठ चवीनुसार
१८. हळद पाव चमचा
१९. काजू ७-८
२०. तेल ४ चमचे
 
कृती-
तांदूळ धून, निथळून २ तास ठेऊन द्यावे. अंडी उकडून त्याचे एकाचे ४ याप्रमाणे उभे काप करून ठेवावे. कोथिंबीर, आले, लसूण व मिरचीची पेस्ट करून घ्यावी. काजूचे लंबे अर्धे काप करून सोनेरी तळून घ्यावे. कुकर मध्ये तेल टाकून मोहरी, जिरे तडतडू द्यावे. मग वेलची, तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरे टाकावे. कांदा लांब पातळ चिरून त्यात टाकावा. तो सोनेरी झाल्यावर तांदूळ टाकून रंग बदले पर्यंत होऊ द्यावे. मग मिरचीची पेस्ट व चिरलेला tomato टाकून २ मिनिटे परतवून घ्यावे. आता पाणी गरम करून टाकावे. हळद, काजू व मीठ टाकावे. कुकर मंद gas वर १५ मिनिटे होऊ द्यावा. कुकर थंड झाल्यावर झाकण काढून त्यात अर्धे अंड्याचे काप टाकून अलगद ढवळून घ्यावे. सर्व्हिंग डीश मध्ये काढून वरून अंड्याचे उरलेले काप सजवावे.

Comments