ओट्स ईडली / oats idli




साहित्य -  

१. ओट्स २ वाट्या
२. रवा १ वाटी
३. दही १ वाटी
४. सोडा अर्धा चमचा
५. फरसबी अर्धी वाटी
६. वाटाणे अर्धी वाटी
७. किसलेले गाजर अर्धी वाटी
८. आल्याची पेस्ट १ चमचा
९. मीठ चवीनुसार
१०. तेल ग्रीसिंग साठी 

कृती -  

ओट्सची मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यावी. एका भांड्यात काढून त्यात रवा टाकावा. दही, चिरलेली फरसबी, वाटाणे, किसलेले गाजर, आले पेस्ट, मीठ, सोडा, आवश्यकतेनुसार पाणी टाकून सर्व नीट एकत्र करावे. १० मिनिटे मुरण्यास ठेऊन द्यावे. इडलीच्या मिश्रणाइतके पातळ करावे. इडली पात्राला तेल लावून मिश्रण ओतून १० ते १५ मिनिटे शिजण्यास ठेवावे. इडल्या तयार झाल्यावर खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाण्यास द्यावे.

Comments