रवा लाडू / suji ladoo




साहित्य - 

१. रवा २ वाटी
२. एका नारळाचा कीस
३. पिठीसाखर पाउण वाटी
४. दुध आवश्यकतेनुसार
५. साजूक तूप ४ चमचे
६. वेलचीपूड पाव चमचा
७. मनुका १०
८. काजू १०
९. पिस्ता १०
१०. बदाम ५ 

कृती -  

एका नॉनस्टीक भांड्यात तूप गरम करून त्यात सर्व ड्रायफ्रूट टाकून थोडे परतून त्यात रवा टाकावा. चांगले परतावे. मग नारळाचा कीस टाकून अजून ३ मिनिटे परतावे. आता साखर, वेलचीपूड टाकून १ मिनिट परतावे. gas बंद करून लाडू वळतील एवढे दुध टाकावे. (चमच्याने टाकत जावे. एकदम टाकू नये) गरमच लाडू वळावे.   

Comments