मटार पनीर सॅन्डविच / matar paneer sandwich




साहित्य -  

१. मटार दीड वाटी
२. पनीर १ वाटी
३. चीज क्युब्ज ३
४. काकडी १
५. टमाटे २
६. कोथिंबीर अर्धी वाटी
७. मिरच्या ५-६
८. आले एक छोटा तुकडा
९. ब्राऊन ब्रेड १ पाकीट
१०. बटर पाव वाटी
११. मीठ चवीनुसार
१२. सॉस आवडीनुसार
१३. पुदिन्याची पाने ७-८ 

कृती -  

मटार कुकर मध्ये ३ शिट्या करून वाफवून घ्यावे. पाणी काढून टाकावे. मिक्सर मध्ये मटार, मिरच्या, कोथिंबीर, आले, मीठ, पुदिन्याची पाने टाकून बारीक करून घ्यावे. त्यात पनीर किसून मिक्स करावे. एका ब्रेडला सॉस लावावा. त्यावर मटारचे मिश्रण पसरवावे. त्यावर काकडी व टमाट्याचे स्लाईसेस ठेवावे. चीज किसून टाकावे. त्यावर दुसरा ब्रेड ठेऊन तव्यावर किंवा सॅन्डविच मेकर मध्ये १ चमचा बटर टाकून ब्रेड दोन्ही बाजूनी खरपूस भाजून मधून कापावा व सर्व्ह करावा. 

Comments