पेपर चीज टोस्ट / pepper cheese toast



साहित्य-
१. ब्रेड १० स्लाईसेस
२. मैदा १ चमचा
३. दुध १ कप
४. शिमला मिरची अर्धी
५. कोथिंबीर अर्धी वाटी
६. चीज क्युब्स २
७. बटर ३ चमचे
८. ऑरेगानो अर्धा चमचा
९. मिरपूड पाव चमचा
१०. मीठ आवश्यकतेनुसार
११. मिरच्या ३
कृती-
प्रथम व्हाईट सॉस बनवण्यासाठी एका भांड्यात १ चमचा बटर घेऊन ते गरम करण्यास ठेवावे. त्यात लगेचच मैदा टाकून ढवळून घ्यावा. मग दुध व मिरपूड टाकून होऊ द्यावे. मीठ टाकून सॉस घट्ट होऊ द्यावा. मग gas बंद करून सॉस थंड होऊ द्यावा. थंड झाल्यावर त्यात बारीक चिरलेली शिमला मिरची, कोथिंबीर, मिरच्या टाकाव्या. आता त्यात ऑरेगानो व किसलेले चीज टाकून मिश्रण चांगले एकत्र करून घ्यावे. आता तवा गरम करून त्यावर बटर सोडावे. सर्व ब्रेड एका साईडने थोड्या भाजून घ्याव्या. आता तयार केलेले वरील मिश्रण थोडे थोडे सगळ्या ब्रेडला उलट्या बाजूने लावून घ्यावे. ह्या स्लाईसेस मायक्रोवेव मध्ये २००w वर ४-५ मिनिटे rack वर ठेवाव्या. ब्रेडच्या कडा ब्राऊन होईपर्यंत ठेवावे. मग काढून सर्व्ह करावे.  

Comments