बेबी कॉर्न हरा मसाला / baby corn green masala



साहित्य-
१. बेबी कॉर्न अर्धा पाव
२. कोथिंबीर १ वाटी
३. पालक १ वाटी
४. लसूण पाकळ्या ५
५. आले एक छोटा तुकडा
६. मोहरी पाव चमचा
७. जिरे पाव चमचा
८. लिंबू अर्धे
९. मिरच्या ४
१०. कांदे २
११. tomato १
१२. मीठ चवीनुसार
१३. पाणी ४ चमचे
१४. तेल ४ चमचे
१५. शिमला मिरची अर्धी
कृती-
बेबी कॉर्न व पालक धून घ्यावा. एका बेबी कॉर्नचे उभे दोन व आडवे दोन काप आश्याप्रमाणे सर्व बेबी कॉर्न चिरून घ्यावे. मिक्सरच्या पॉट मध्ये पालक, कांदा, जिरे, मिरच्या, आले, लसूण, पाणी, कोथिंबीर घालून बारीक पेस्ट करून घ्यावी. एका कढईत तेल घेऊन त्यात मोहरी तडतडू द्यावी. त्यात पेस्ट टाकून २ मिनिटे परतवून घ्यावी. मग त्यात बेबी कॉर्न व उभी चिरलेली शिमला मिरची टाकून मंद gas वर झाकण ठेऊन होऊ द्यावे. १५ ते २० मिनिटे २-३ वाफा काढून ढवळून घ्यावे. मग शिजल्यावर त्यात मीठ, लिंबू व tomato च्या मोठ्या फोडी टाकाव्या. १ मिनिटाने gas बंद करून पुलाव बरोबर गरम गरम सर्व्ह करावे.  

Comments