मशरूम तडका / mushroom tadka



साहित्य-
१. मशरूम उभे चिरलेले ३ वाट्या
२. शिमला मिरची उभी चिरलेली १ वाटी
३. सुक्या लाल मिरच्या ४
४. ऑरेगानो अर्धा चमचा
५. जिरे अर्धा चमचा
६. ऑलिव्ह ऑईल ३ चमचे
७. कोथिंबीर पाव वाटी
८. मीठ चवीनुसार
९. लसूण ८ पाकळ्या
१०. लिंबू अर्धे
कृती-
एका कढईत तेल घेऊन त्यात जिरे तडतडू द्यावे. त्यात बारीक चिरलेला लसूण टाकावा. लाल मिरच्यांचे हाताने तुकडे करून टाकावे. आता शिमला मिरची टाकून झाकण ठेवावे. २-३ मिनिटे बारीक gas वर शिजू द्यावे. आता झाकण काढून मशरूम टाकावे. परत झाकण ठेऊन ३ मिनिटे होऊ द्यावे. शिजल्यावर त्यात मीठ, लिंबू, ऑरेगानो टाकून एकदा ढवळून घ्यावे. एक मिनिटाने gas बंद करून कोथिंबीर टाकावी. गरम गरम पुलाव बरोबर खाण्यास द्यावे.

Comments