चीकन टिक्का मसाला / chicken tikka masala



साहित्य-
१. बोनलेस चिकन पाव किलो
२. तेल ५ चमचे
३. कोथिंबीर अर्धी वाटी
४. आले एक छोटा तुकडा
५. लसूण ७-८ पाकळ्या
६. टमाटे २
७. कांदे ३
८. दही १ चमचा
९. लाल रंग छोटा पाव चमचा
१०. तिखट चवीनुसार
११. मिठ चवीनुसार
१२. दालचिनी २ तुकडे
१३. धने दीड चमचा
१४. वेलची ४
१५. लवंग ४
१६. चिकन मसाला अर्धा चमचा
कृती-
चिकनला थोडेसे मीठ, दही, तिखट, रंग लावून चोळून घ्यावे. १ तास मुरात ठेवावे. नंतर ओव्हन मध्ये ३००w वर २०-२५ मिनिटे वरील rack वर ओव्हन प्रूफ प्लेट मध्ये ठेवून तंदूर सारखे दोन्ही बाजूनी ग्रील करून भाजून घ्यावे. तुकड्यांची बाहेरील बाजू खरपूस झाली की काढून घ्यावे. आले, लसूण, दालचिनी, धने, वेलची, लवंग मिक्सर मध्ये थोडे पाणी टाकून बारीक वाटून घ्यावे. आता एका पातेल्यात तेल तापवून बारीक चिरलेला कांदा परतवून घ्यावा. मग टमाटे, वाटण, तिखट, मीठ, गरम मसाला घालून थोडे परतवून घ्यावे. आता एक वाटी पाणी टाकून उकळी येऊ द्यावी. gas बंद करून वरून चिकन चे पिसेस व कोथिंबीर घालून गरम गरम तंदुरी रोटी बरोबर सर्व्ह करावे.

Comments