फिश टिक्का / fish tikka



साहित्य-
१. मासा (शक्यतोवर बोनलेस) ५०० gm
२. बटर २ चमचे
३. आले लसूण पेस्ट २ चमचे
४. मीठ चवीनुसार
५. लिंबू अर्धे
६. दही २ चमचे
७. चीज १ क्यूब किसलेले
८. अंड १
९. बेसन १ चमचा
१०. गरम मसाला १ चमचा
११. तिखट १ चमचा
१२. हळद पाव चमचा
कृती-
माश्याचे दीड इंचाचे तुकडे करून घ्यावे. मासा व बटर सोडून वरील सर्व साहित्य एकत्र करावे. आता मास्याला सगळीकडे लागेल असे चोळून घ्यावे. व मुरण्यासाठी फ्रीज मध्ये २ तास ठेऊन द्यावे. मग एका मायक्रोवेव प्रूफ पॉट ला बटर लावून त्यावर माश्याचे तुकडे ठेवावे. परत वरून थोडेसे बटर सोडावे. आता मायक्रोवेव मध्ये ३००w+ग्रील वर ८ मिनिटे वरील rack वर पॉट ठेवावा. वरील बाजू ब्राऊन झाल्यास तुकडे पलटवून परत त्याच टेम्प्रेचर वर ठेवावे. गरम सर्व्ह करावे. 

Comments