बदाम कुकीज / almond cookies



साहित्य-
१. बदाम अर्धी वाटी
२. लोणी पाऊण वाटी
३. ब्राऊन शुगर अर्धी वाटी
४. साखर पाव वाटी
५. मीठ पाव चमचा
६. मैदा २ वाट्या
७. अंड १
८. बेकिंग पावडर पाव चमचा
९. व्हनीला इसेन्स पाव चमचा
कृती-
प्रथम मिक्सरच्या भांड्यात लोणी फिरवून घेणे. मग त्यात ब्राऊन शुगर, साखर, टाकून परत एकदा चांगले फिरवून घेणे. आता त्यात अंड, इसेन्स, मीठ, मैदा, बेकिंग पावडर टाकून मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत फिरवून घेणे. एका कटोऱ्यात काढून त्यात बदामाचे तुकडे करून टाकणे. आता मायक्रोवेव्ह प्रूफ प्लेट मध्ये ह्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून दूर दूर ठेवावे. अन्यथा ते एकमेकांना चीकटण्याची शक्यता असते. मायक्रोवेव्ह मध्ये ही प्लेट ६००w वर मायक्रोवेव्ह+ग्रील मोड मध्ये २ मिनिटे ४० सेकंद करिता ठेवावी. बिस्किटे वरील बाजूने ब्राऊन होताना दिसली की मायक्रोवेव्ह बंद करावा. 

Comments