दम आलू सुक्खा / dum aloo sukhha



साहित्य-
१. छोटे बटाटे १ पाव
२. कांदे ३
३. सुके खोबरे अर्धी वाटी
४. गरम मसाला अर्धा चमचा
५. काळा मसाला अर्धा चमचा
६. तिखट चवीनुसार
७. मीठ चवीनुसार
८. तेल आवश्यकतेनुसार
९. टमाटा १
१०. कोथिंबीर अर्धी वाटी
११. कसुरी मेथी अर्धा चमचा
१२. हळद पाव चमचा
१३. लसूण पाकळ्या ७-८
१४. आले एक छोटा तुकडा
कृती-
बटाटे धून त्याची साले काढून घ्यावी. प्रत्येक बटाट्याला चाकूने ३-४ टोचे मारून घ्यावे. एका भांड्यात बटाटे बुडतील एवढे तेल घेऊन ते चांगले ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यावे. कांदे व खोबरे बारीक कापून घ्यावे. त्यातील एक कांदा वेगळा ठेवावा. आता एका तव्यावर एक चमचा तेल घेऊन त्यावर चिरलेले दोन कांदे ब्राऊन होईपर्यंत भाजावे. तसेच खोबरे भाजावे. आता हे कांदे, खोबरे, लसूण व आले पाणी टाकून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे. बटाटे तळलेल्या भांड्यातील तेल काढून त्याच भांड्यात पाच चमचे तेल तापवावे. त्यात चिरलेला एक कांदा परतवून घ्यावा. वरील वाटण, कसुरी मेथी, चिरलेला टमाटा, गरम मसाला, काळा मसाला, हळद व तिखट टाकून एक मिनिट होऊ द्यावे. मग बटाटे व मीठ टाकून मिक्स करून झाकण ठेवावे. २-३ मिनिटांनी झाकण काढून घ्यावे. व gas बंद करून कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे. 

Comments