मशरूम सूप / mushroom soup



साहित्य-
१. मशरूम्स ३ मोठे
२. कॉर्नफ्लोअर अर्धा चमचा
३. पाणी आवश्यकतेनुसार
४. मीठ चवीनुसार
५. मिरपूड अर्धा चमचा
६. ऑरेगानो अर्धा चमचा
७. चीज क्यूब १
८. दुध पाऊण कप
९. कोथिंबीर २ चमचे
१०. बटर अर्धा चमचा
कृती-
मशरूम्स चांगले धून घ्यावे. त्याचे साधारण अर्धा सेंटीमीटर आकाराचे तुकडे करावे. त्यातील २ मशरूम्सचे तुकडे व दुध एकत्र करून gas वर शिजायला ठेवावे. मंद gas वर ५ मिनिटे शिजवावे. शिजल्यावर थंड करून मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. एका वाटीत कॉर्नफ्लोअर व अर्धा कप पाणी मिक्स करून घ्यावे. आता एका भांड्यात बटर घेऊन मशरूम चे वाटण टाकावे. उकळी आल्यावर कॉर्नफ्लोअर व पाण्याचे चे मिश्रण टाकावे. ढवळत राहावे व उकळी येऊ द्यावी. आता उरलेले मशरूम्सचे तुकडे, ऑरेगानो, मिरपूड, मीठ टाकून २ मिनिटे शिजू द्यावे. आता पातळ करायचे असल्यास हवे तितके पाणी टाकावे. व परत १ मिनिट उकळू द्यावे. कोथिंबीर टाकून gas बंद करावा. सर्व्ह करताना बाऊल मध्ये गरम गरम काढून वरून चीज किसून टाकावे. 

Comments