कोथिंबीर वड्या (वाफवलेल्या) / kothimbir vadi (steamed)



साहित्य-
१. कोथिंबीर २ वाट्या
२. बेसन दीड वाटी
३. चिंचेचा कोळ ४ चमचे
४. तिखट चवीनुसार
५. मीठ चवीनुसार
६. हळद पाव चमचा
७. कांदे २
८. जिरे पूड अर्धा चमचा
९. धने पूड अर्धा चमचा
१०. पाणी आवश्यकतेनुसार
११. तेल आवश्यकतेनुसार
कृती-
कोथिंबीर धून पाणी निथळून चिरून घ्यावी. त्यात बेसन, चिंचेचा कोळ, तिखट, मीठ, हळद, बारीक चिरलेले कांदे, जिरे पूड, धने पूड, टाकून एकत्र करावे. आवश्यकता असल्यास पाणी टाकून घट्ट गोळा भिजवावा. एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यावर चाळणी ठेवावी. चाळणीला तेल लावून घ्यावे. आता त्या गोळ्याला लाटन्यासारखा लांबट आकार द्यावा. असे दोन गोळे बनतात. हे गोळे चाळणीवर ठेवावे. १५-२० मिनिटे मेडियम आचेवर शिजू द्यावे. मध्ये पलटून घ्यावे. शिजल्यावर त्याचे गोल गोल चाकुने काप करून घ्यावे. आता तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे. व खायला द्यावे. 

Comments