चीजी सरप्राईज कबाब / cheesy surprise kabab



साहित्य-
१. ब्रेड स्लाईसेस ५
२. बटाटा १ उकडून
३. मिरची, आले, लसूण पेस्ट १ चमचा
४. चीज २-३ क्युब्स
५. तेल तळण्यासाठी
६. कोथिंबीर अर्धी वाटी
७. उकडलेले वाटणे, गाजर, फुलकोबी १ वाटी
कृती-
उकडलेल्या भाज्यांमधील सर्व पाणी निथळून कोरड्या करून घ्याव्या. त्यात ब्रेड स्लाईसेस चा बारीक चुरा करून टाकावा. त्यात मिरची, आले, लसूण पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, व मीठ टाकून मिश्रण एकजीव करावे. कोरडे करण्यासाठी हवे असल्यास अजून ब्रेड टाकावा. त्याचे छोटे छोटे हवे त्या आकाराचे गोळे करावे. प्रत्येक गोळ्याच्या मध्ये किसलेले चीज थोडेसे भरून गोळा बंद करून घ्यावा. (हे गोळे ब्रेडक्रम्स मध्ये घोळवले तरी चालतात). आता एका कढईत तेल घेऊन गरम करावे. व कबाब तळून घ्यावे. गरम गरम सॉस बरोबर सर्व्ह करावे. 

Comments