कारल्याची किसून भाजी / karela sabji



साहित्य-
१. कारली ४ मोठी
२. कांदे ४
३. मोहरी पाव चमचा
४. हळद पाव चमचा
५. जिरे पाव चमचा
६. तिखट चवीनुसार
७. मीठ चवीनुसार
८. मिरच्या ५
९. ओले खोबरे अर्धी वाटी
१०. कोथिंबीर ३ चमचे
११. आले-लसूण पेस्ट १ चमचा
१२. गरम मसाला अर्धा चमचा
१३. लिंबू १
१४. तेल ५ चमचे
कृती-
कारली बियांसकट किसून घ्यावी. त्यात २ चमचे मीठ व अर्धे लिंबू घालुन चोळावे. १ तास झाकून ठेवावे. नंतर कीस चांगला पिळून घ्यावा. त्यातील सर्व रस काढून टाकावा. त्यात पाणी टाकून परत एकदा चोळून पिळून घ्यावा. आता एका पातेल्यात तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे तडतडू द्यावे. मग त्यात मिरच्या व कांदा परतवून घ्यावा. आता त्यात हळद, तिखट, गरम मसाला, आले-लसूण पेस्ट टाकून थोडे होऊ द्यावे. आता कारल्याचा कीस टाकून ढवळून झाकण ठेऊन भाजी शिजू द्यावी. २-३ वाफा काढाव्या. मग शेवटी लिंबू, मीठ व खवलेले ओले खोबरे टाकून ढवळावे. gas बंद करून चिरलेली कोथिंबीर पेरावी व भाजी खाण्यास द्यावी. 

Comments