फ्रुट कस्टर्ड / fruit custard



साहित्य-
१. व्हनिला कस्टर्ड पावडर ३ चमचे
२. दूध ३ पाव  
३. साखर दिड वाटी
४. डाळींबाचे दाणे १ वाटी
५. संत्र्याच्या फोडी साल काढून व तुकडे करून १ वाटी
६. strawberry चिरून १ वाटी
७. चिकूची साले काढून फोडी अर्धी वाटी
८. पेरूच्या बिया काढलेल्या फोडी अर्धी वाटी
९. सफरचंदाची साले काढून फोडी अर्धी वाटी
१०. द्राक्ष दोन भाग करून चिरलेले १ वाटी
११. काजूचे तुकडे अर्धी वाटी
कृती-
दुधात कस्टर्ड पावडर व साखर एकत्र करून gas वर ठेवावे. व सतत ढवळत राहावे. थोड्या वेळात दुध घट्ट होईल. दुध चांगले उकळले की gas बंद करून थंड होऊ द्यावे. मग फ्रीज मध्ये ३-४ तास चांगले थंड होऊ द्यावे. मग त्यात सर्व फळे व काजू टाकून ढवळून घ्यावे. व थंडच सर्व्ह करावे. 

Comments