मेव्याचे लाडू / dry fruits ladoo



साहित्य-
१. काजू १०० gm
२. बदाम १०० gm
३. गोडंबी ५० gm
४. सुके खोबरे २५० gm
५. डींक २५० gm
६. अंजीर ५
७. मनुका २०
८. पीस्ता ५० gm
९. बनारसी साखर अर्धा किलो 
१०. साजूक तूप आवश्यकतेनुसार
११. खारीक अर्धा किलो
कृती-
डींक साजूक तुपात तळून घ्यावा. सुके खोबरे, अंजीर व खारीक चे अडकित्याने बारीक तुकडे करून घ्यावे. काजू, बदाम, गोडंबी, सुके खोबरे, डींक, अंजीर, पिस्ता, खारीक हे सर्व वेगवेगळे मिक्सर मध्ये बारीक फिरवून घ्यावे. आता सर्व पदार्थ एकत्र करून त्यात साखर टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. व लाडू वळता येतील अश्या प्रमाणात साजूक तूप टाकून लाडू वळावे.
टीप-
हे लाडू थंडीच्या दिवसात करतात. व हे औषधी असल्यामुळे सकाळी उपाशीपोटी खावे. 

Comments