गाजराचे लोणचे / carrot pickle



साहित्य-
१. गाजरे ३ मोठी
२. लोणचे मसाला ४ चमचे
३. पांढरी मोहरी १ चमचा
४. जिरे १ चमचा
५. मीठ चवीनुसार
६. साखर अर्धा चमचा
७. हींग पाव चमचा
८. तेल ५ चमचे
९. लिंबू १
कृती-
गाजर हवे त्या आकारात चिरून घ्यावे. त्यात लोणचे मसाला, साखर, मीठ व लिंबू टाकून, ढवळून १ तास ठेवून द्यावे. मग तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे तडतडू द्यावे. मग हींग टाकून gas बंद करावा. ही फोडणी गाजरांच्या फोडींमध्ये ओतून द्यावी. आता गाजराचे लोणचे खाण्यास तैयार आहे.

Comments