मेक्रोनी विथ स्पिनच / macaroni with spinach



साहित्य-
१. मेक्रोनी २ वाट्या
२. पालक १ वाटी
३. tomato १
४. कांदा १
५. शिमला मिरची १
६. काळीमिरी पूड १ चमचा
७. मीठ चवीनुसार
८. चीज क्युब्स २
९. पाणी आवश्यकतेनुसार
१०. ओलिव्ह ऑईल ३ चमचे
११. बेझल लीव्ह्स १ चमचा 
कृती-
मेक्रोनी डुबून पाणी बोटभर वर येईल इतके पाणी मेक्रोनीत टाकून भांडे gas वर ठेवावे. त्यात अर्धा चमचा तेल व मीठ टाकून शिजू द्यावे. मेक्रोनी बोटाने तुटू लागली की चाळणीत काढून पाणी निथळून घ्यावे. एका कढईत तेल घेऊन त्यात चिरलेला कांदा परतवून घ्यावा. आता त्यात चिरलेली शिमला मिरची व tomato टाकून परतावे. चिरलेला पालक, थोडेसे मीठ, काळीमिरी पूड, बेझल लीव्ह्स टाकून परतावे. आता मेक्रोनी टाकून ढवळून घ्यावे. व सगळ्यात शेवटी चीज किसून टाकावे. व बारीक gas वर एक मिनिट होऊ द्यावे. gas बंद करून लगेच सर्व्ह करावे.
ओव्हन मध्ये करायचे असल्यास-
चीज टाकण्यापुर्विपर्यन्तची सर्व प्रक्रिया gas वर करून मग एका मायक्रोवेव्ह प्रूफ भांड्यात काढून वरून चीज किसून ते भांडे मायक्रोवेव्ह मध्ये ५ मिनिताकरिता मायक्रोवेव्ह मोड वर ठेवून द्यावे. व लगेच सर्व्ह करावे.   

Comments